शिवकालीन कागदोपत्री उल्लेख
"जोशी" हे आडनाव सहसा सर्वच ब्राह्मण उपजातींमध्ये आढळते. तसेच गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश इत्यादी इतर राज्यांतही हे आडनाव वाचायला मिळते. पण चित्पावन ब्राह्मणांमध्ये शांडिल्य गोत्र असणारे जोशी म्हणजे कुलदैवत - श्री लक्ष्मी केशव, कोळिसरे - असणारे.
पूर्वजांबद्दल माहित असणे हे न केवळ आपल्या DNA मधे काय गुपितं दडली आहेत वा काय पराक्रम दडला असू शकतो हे कुतूहल म्हणून अथवा गंमत म्हणून अवगत करणे असे नाही. तर आपण कळत-नकळत एक नाव धारण करून जणू एक जबाबदारी पेलत असतो.
सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे गुरु / निकटवर्ती म्हणून शांडिल्य गोत्री जोशी - असा संदर्भ शिवकालीन कागदोपत्रांत आढळतो.
पुस्तक : दर्याराज कान्होजी आंग्रे - लेखक : डॉ. सदाशिव शिवदे -
एक (दंत?) कथा ही प्रचलित आहे.
बालपणी रानात निपचित आराम करत असताना एक नाग आपला फणा काढून कान्होजी आंग्रेंच्या डोक्याजवळ ऐटीत उभा असल्याचे पाहून सर्वच उपस्थित चकित होतात. आणि शांडिल्य गोत्र - जोशी घराण्याची व्यक्ती घडलेल्या घटनेस 'राजयोग' असल्याचे नमूद करते.
संदर्भ : दर्याचा राजा - कान्होजी आंग्रे - लेखिका : नयनतारा देसाई.
ता. क.
शांडिल्य गोत्र असणारे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण 'जोशी' ह्यांचा सरखेल कान्होजी आंग्रे ह्या शिवकालीन घराण्याशी निकटचा संबंध होता आणि ज्योतिष विद्येत पारंगत म्हणून शिवरायांच्या काळात ह्या घराण्याची ख्याती होती.
Comments
Post a Comment