Posts

शिवकालीन कागदोपत्री उल्लेख

Image
  "जोशी" हे आडनाव सहसा सर्वच ब्राह्मण उपजातींमध्ये आढळते. तसेच गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश इत्यादी इतर राज्यांतही हे आडनाव वाचायला मिळते. पण चित्पावन ब्राह्मणांमध्ये शांडिल्य गोत्र असणारे जोशी म्हणजे कुलदैवत - श्री लक्ष्मी केशव, कोळिसरे - असणारे. पूर्वजांबद्दल माहित असणे हे न केवळ आपल्या DNA  मधे काय गुपितं दडली आहेत वा काय पराक्रम दडला असू शकतो हे कुतूहल म्हणून अथवा गंमत म्हणून अवगत करणे असे नाही. तर आपण कळत-नकळत  एक नाव धारण करून जणू एक जबाबदारी पेलत असतो.  सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे गुरु / निकटवर्ती म्हणून शांडिल्य गोत्री जोशी - असा संदर्भ शिवकालीन कागदोपत्रांत आढळतो.  पुस्तक : दर्याराज कान्होजी आंग्रे  - लेखक : डॉ. सदाशिव शिवदे -  Greek Origins Of Konkanastha Chitpavan Brahmin Community From Maharashtra पुस्तकाचे लेखक  - डॉ. प्रताप जोशी ह्यांच्या एका पत्रामध्ये उल्लेख  डॉक्टर प्रताप जोशींचा हा दावा खरा ठरतो तो कान्होजी आंग्रेंच्या काही पत्रांमधल्या उल्लेखामुळे.  इतिहासकार राजवाडे - मराठ्यांच्या इतिहासातील साधने ...